राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय आणि त्यावर उपाय म्हणून महाराष्ट्र शासनानं ओनियन महा बँक ही योजना सुरु करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. ही एक केंद्रीकृत सुविधा विकसित करणारी योजना आहे ज्या माध्यमातनं काढणी नंतर लगेचच कांद्यावर प्रक्रिया करण्यासाठी आणि त्याची साठवणूक करण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकेल.