पुण्याच्या पाषाण परिसरात अण्णा हजारेंविरोधात बॅनरबाजी करण्यात आली. हजारे यांना बॅनरमधून पुणेरी टोमणे मारण्यात आले.'देशात मतांची चोरी होतेय, अण्णा आतातरी उठा'.तसंच कुंभकर्णसुद्धा गाढ झोपेतून रावणासाठी आणि लंकेसाठी उठला होता.तुम्ही आपल्या देशासाठी तरी उठा असा आशय या बॅनरवर पहायला मिळतो. अण्णा तुमच्या सारखा जेष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा? असा सवालही बॅनरमधून करण्यात आला.पाषाण भागातील सामाजिक कार्यकर्ते समीर उत्तरकर यांनी हे बॅनर लावलेत.