Pune| FDA | चाकणमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई, 1 कोटी 13 लाखांचा गुटखा जप्त

चाकणमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे.गोपनीय माहितीच्या आधारे प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा तब्बल सहा तास पाठलाग करण्यात आला.यानंतर चाकण-तळेगाव चौकात ट्रक अडवून विविध कंपन्यांचा पानमसाला आणि सुगंधित तंबाखूसह १ कोटी १३ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी चालकासह पाच जणांविरोधात बीएनएस आणि अन्न सुरक्षा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune | FDA | Major crackdown by the Food and Drug Administration in Chakan; Gutkha worth ₹1.13 crore seized.

संबंधित व्हिडीओ