शरद पवारसोबत इंडिया आघाडीच्या नेत्यांची चर्चा झाली.. डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवारांची राष्ट्रवादी पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे. त्यांची मनधरणी करण्यासाठी राहुल गांधी, मल्लिकार्जून खरगें, ममता बॅनर्जीसह इंडिया आघाडीचे मुख्य नेत्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंची भेट घेतली. या नेत्यांमध्ये जवळपास 40 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र या चर्चेत नेमक काय झालं, शरद पवार काय भूमिका घेणार हे अद्याप समोर आलेलं नाहीय. दरम्यान आमची लढाई सुरु असून सगळं ठीक असल्याची प्रतिक्रिया राहुल गांधींनी दिलीय.