राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आणणारं वक्तव्य शिवसेना आमदार बच्चू कडू यांनी केलंय.. 15 डिसेंबरनंतर शरद पवार राज्याच्या सत्तेत दिसतील, असा दावा कडू यांनी केलाय.. विशेष म्हणजे हे कोणत्याही विलिनीकरणाशिवाय होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. याचबरोबर केंद्राच्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा दर्शवत, अमरावतीसारख्या जिल्ह्यात दोन खासदार झाल्यास लोकांचा आवाज अधिक प्रभावी होईल, असंही बच्चू कडू म्हणाले आहेत.