रविपुष्यामृत योग, खरेदी, गुंतवणूक, नवीन शुभकार्यांसाठी शुभ दिवस; सोनं खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

आज पुष्य नक्षत्र आलंय. त्यामुळे रविपुष्य योग आला असून हा योग खरेदी, गुंतवणूक आणि नवीन शुभकार्यांसाठी विशेष मंगल मानला जातोय..या दिवशी केलेली सोन्याची खरेदी शुभ व फलदायी मानतात..रविपुष्य योगात सोनं खरेदी करण्यासाठी वेगळा मुहूर्त पाहण्याची परंपराही आहे..दरम्यान हा योग अत्यंत दुर्मिळ आहे आणि वर्षातून काही वेळाच येतो.या दिवशी मौल्यवान धातू मौल्यवान रत्ने, पितळ इत्यादी धातू खरेदी करणे देखील संपत्ती आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे आज दिवसभर सोनं खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं

संबंधित व्हिडीओ