अलिबागजवळ खांदेरी किल्ल्याजवळ एक मच्छीमार बोट बुडाली असून त्यावरील 5 खलाशांनी पोहत समुद्र किनारा गाठला आहे. 9 तास पोहून या खलांशांनी किनारा गाठलाय. उर्वरित तीन बेपत्ता खलाशांचा शोध सुरुय. मासेमारीवरील बंदी उठायला आणखी आठवडा बाकी असतानाच मच्छीमार बोटी समुद्रात गेल्याची माहिती आहे.