रत्नागिरी जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, महायुतीमधील जागावाटपावरून शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मित्रपक्ष भाजपला थेट इशारा दिला आहे. महायुतीमध्ये 'सन्मानजनक' जागावाटप व्हावे, हा कळीचा मुद्दा असून, जागावाटप न झाल्यास शिवसेना (शिंदे गट) स्वबळावर लढण्यास तयार असल्याचा सामंतांचा सूचक इशारा आहे