RBI ला मिळाला ‘बॅकअप कवच’; ओडिशातून सुरक्षित होणार देशाची बँकिंग व्यवस्था | NDTV मराठी

पंतप्रधान मोदी यांनी ओडिशातील खुर्दा जिल्ह्यात उभारलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दुसऱ्या डेटा सेंटरचे उद्घाटन केले. भुवनेश्वरजवळील इन्फो व्हॅली-II येथे 18.55 एकर परिसरात उभारलेले हे केंद्र नवी मुंबईतील RBI च्या मुख्य डेटा सेंटरसाठी आपत्ती पुनर्प्राप्ती बॅकअप म्हणून काम करेल. एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे, विध्वंसामुळे किंवा हल्ल्यामुळे मुंबईतील डेटा सेंटर प्रभावित झाल्यास ओडिशा सेंटरमधून बॅकअप सेवा सुरू राहील. यामुळे देशाच्या संपूर्ण बँकिंग आणि पेमेंट व्यवस्थेत कोणताही व्यत्यय येणार नाही.

संबंधित व्हिडीओ