आता एक आश्चर्यजनक बातमी..... राम गल्ली.... कृष्णनगर.... धरमपुरा... लक्ष्मीचौक अशी नावं भारतात सर्रास पाहायला मिळतात... मात्र ही सगळी नावं चक्क पाकिस्तानातल्या रस्त्यांना देण्यात आली आहेत... हे ऐकून आश्चर्य वाटेल... पण हे खरं आहे... पाकिस्तानच्या या निर्णयामुळे जगभरातही आश्चर्य व्यक्त केलं जातंय. कारण कायम भारताच्या विरोधात असणाऱ्या पाकिस्ताननं काही प्रमुख ठिकाणांची नावं बदलून चक्क हिंदू देव-देवतांची नावं दिलीयत.लाहोर शहरातल्या चौकांची इस्लामिक नाव बदलून चक्क हिंदू संस्कृतीतली नावं ठेवण्यात आलीयत... पाकमधील कोणत्या चौकांची नावं बदलण्यात आली पाहूयात.पाकिस्तानातल्या रस्त्यांची नावं बदलून हिंदू नावं ठेवण्याचं हे काम २०२५ पासून सुरू करण्यात आलं. त्यासाठी पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी पुढाकार घेतला.