देशभर गाजत असलेल्या NEET-UG पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र हे मोठे केंद्र बनल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. लातूर, नांदेड, नाशिक, पुणे, नागपूर आणि चंद्रपूरपर्यंत या रॅकेटचे धागेदोरे पोहोचल्याची माहिती तपास यंत्रणांकडून समोर येत आहे. आर्थिक व्यवहारांचे मोठे नेटवर्क उघड होत असल्याने आता हे प्रकरण केवळ पेपरफुटीपुरते मर्यादित न राहता आर्थिक गैरव्यवहारांच्या चौकशीपर्यंत पोहोचले असून, ईडी देखील सतर्क झालीये