Special Report|छत्रपती संभाजीनगरमध्ये आई-वडिलांनीच घेतला चिमुकल्याचा जीव,अपंगत्वाचं ओझं समजून हत्या?

छत्रपती संभाजीनगरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय, ज्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय. पोटच्या पाच वर्षांच्या गतिमंद आणि दिव्यांग मुलाचा त्याच्याच जन्मदात्या आई-वडिलांनी क्रूरपणे जीव घेतल्याचा आरोप आहे..हर्सूल सावंगी बायपास परिसरातील एका निर्जन शेतात या निष्पाप चिमुकल्याचा मृतदेह आढळून आलाय. घटनास्थळावरचं दृष्य इतकं भयानक होतं की, ते पाहून कठोर काळजाचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारीही काही क्षण जागेवरच गोठून गेले.

संबंधित व्हिडीओ