Rupali Chakankar यांचा स्वतःचा ट्रेडमार्क; सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे, संगिता तिवारी काय म्हणाल्या?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकरांनी स्वतःचा ट्रेडमार्क त्यांचे व्यक्तिगत कॉपी राइट्स आरक्षित केलेत. रुपाली चाकणकरांचं नाव, त्यांचा फोटो, त्यांची ओळख, आणि त्यांची वैयक्तिक शैली आणि त्यांची स्वतःला सादर करण्याची विशिष्ट पद्धत आता ट्रेडमार्क असेल आणि त्याची नोंदणी चाकणकरांनी केलीय. रुपाली चाकणकरांनी यासंदर्भात पोस्ट करून माहिती दिलीय. परवानगीशिवाय कोणीही नाव, फोटो, ओळख किंवा विशिष्ट शैलीचा स्वतःच्या फायद्यासाठी किंवा व्यावसायिक कारणासाठी करु नये असं आवाहन चाकणकरांनी केलंय.. कोणत्याही प्रकारचे फोटो, व्हिडिओ, फिल्म, रील, इतर कोणतेही साहित्य तयार करण्यासाठी, वापरण्यासाठी किंवा प्रसिद्ध करण्यासाठी वापर केल्यास, अशा व्यक्तीविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलाय. यावरून विरोधकांनी चाकरणकरांवर निशाणा साधलाय.दरम्यान यावर सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे आणि संगिता तिवारींनी काय प्रतिक्रिया दिलीय पाहुयात...

संबंधित व्हिडीओ