अक्कलकोट | संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना शिवप्रेमींनी फासलं काळं; नेमका वाद काय?| NDTV मराठी

संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट या ठिकाणी काळं फासवण्यात आलेलं आहे. प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट मध्ये फतेहसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या एका कार्यक्रमासाठी आले होते. त्याच वेळेस शिवधर्म फाउंडेशन आणि शिवप्रेमींनी त्यांना काळं फासल्याचं कळतंय. प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला होता आणि त्याच मुळे शिवधर्म फाउंडेशन चांगलच आक्रमक झालंय त्याचबरोबर स्वामी समर्थांचा देखील एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान केल्याचा आरोप करत यावेळेस या शिवप्रेमींनी त्यांच्या चेहऱ्याला काळं फासलेलं आहे.

संबंधित व्हिडीओ