संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर येतेय. देशमुखांच्या हत्येपूर्वी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेची शेवटची भेट मुंबईत झाल्याची माहिती मिळतेय.5 डिसेंबरला वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेची शेवटची भेट झालीय. कराडची भेट घेण्यापूर्वी विष्णू चाटे धनंजय मुंडेंना भेटला होता अशीही माहिती समोर आलीय. त्यानंतर 7 डिसेंबरला विष्णू चाटे पुण्याला पोहचला होता आणि 8 डिसेंबरला विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांची एका हॉटेलमध्ये पार्टी झालीय.