'येळकोट येळकोट जय मल्हार' आणि 'सदानंदाचा येळकोट' च्या अखंड जयघोषात जेजुरी गडावर सोमवती अमावस्येचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला आहे! लाखो भाविकांनी जेजुरी गडावर सुवर्णनगरीत भंडाऱ्याची मुक्त उधळण करत खंडोबा देवतेचे दर्शन घेतले. देवाच्या पालखीचे कऱ्हा नदीकाठावरील पवित्र तीर्थस्नान आणि भंडार खोबऱ्याच्या पिवळ्याधमक रंगाने सजलेल्या जेजुरी गडाचे हे डोळे दिपवणारे 'ड्रोन दृश्य' (Drone Visuals) नक्की पहा!