अखेर 50 वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या निळवंडेच्या पाण्याची प्रतिक्षा संपलीय.निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील 185 गावांना निळवंडेच्या पाण्याचा लाभ झालाय.कालव्याची कामं पूर्ण झाल्यावर गावागावातील तलावात हे पाणी साडलं जातंय..गावोगावी जलपूजन करून आनंदोत्सव साजरा होतोय.राहातामधील आशा खडके वाके गावातही बंधारा भरून वाहू लागलाय.त्यामुळे शेतकरी आनंदी झाले असून त्यांच्या भावना जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी सुनिल दवंगे यांनी.