डबल मर्डर आणि एका हाफ मर्डरने साईंची शिर्डी हादरुन गेली.साई संस्थानचे दोन कर्मचारी कामावरुन परत येत असताना त्यांच्यावर वार करत त्यांची हत्या करण्यात आली.तर दुसरीकडे एका कंत्राटी कर्मचाऱ्याच्या खुनाचा प्रयत्नही करण्यात आलाय.मृत्यू झालेले दोघंही शिर्डीतीलच रहिवासी आहेत. एका तासात लागोपाठ तीन ठिकाणी रस्त्यावरुन जाणा-या व्यक्तींवर वार करण्यात आलंय.साई संस्थान कर्मचारी सुभाष घोडे आणि साई संस्थानचे कंत्राटी नितीन शेजूळ या दोघांवर वार झाल्यान त्यांचा बळी गेलाय.तर कृष्णा देहरकर यांच्यावर देखील वार झाले असून ते गंभीररित्या जखमी झाले आहेत याप्रकरणी सुजय विखे पाटलांनी शिर्डीतील स्थानिकांशी बातचीत केली.