हिंगोली जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेली कयाधू नदी प्रदूषणात विळख्यात सापडलीय.शहरातील कचरा आणि सांडपाणी नदीपात्रात सोडल्या जात असल्यामुळे ही नदी प्रदुषित होत आहे, जिल्हयातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील जमिनी या नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत, नदीपात्रातील दुषित पाणी जनावरे पीत असल्याने जनावरांमध्ये आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही, कयाधू नदीपात्र प्रदूषणाच्या विळख्यातुन मुक्त करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जात आहे..या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी..