बीडची घटनेवरून चंद्रपूरच्या जिल्हा नियोजन बैठकीत पडसाद उमटल्याचं समोर आलंय.चंद्रपूरचा बीड होऊ द्यायचा नाही,असं सुधीर मुनगंटीवार म्हणाल्याचा दावा विजय वडेट्टीवारांनी केलाय.चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा प्रकार घडल्याचं त्यांनी सांगितलंय.दरम्यान, सुधीर मुनंगटीवारांनी देखील वडेट्टीवारांच्या दाव्याला दुजोरा दिलाय.चंद्रपुरातील गुन्हेगारी वाढू नयते यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचं मुनगंटीवारांनी म्हटलं.चंद्रपूरमध्ये गुन्हेगारी वाढू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. असंही मुनगंटीवार म्हणालेत.