महाकुंभादरम्यान वसंत पंचमीच्या दिवशी विशेष अमृत स्नानाचं आयोजन आजच्या ब्रह्म मुहूर्तावर करण्यात आलं होतं.सकाळी 5.23 ते 6.16 पर्यंत पवित्र अमृत स्नानाचा सोहळा संपन्न झालाय.महाकुंभाच्या या पर्वात सहभागी होण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यासह जगभरातून भाविक येत आहेत.या ठिकाणी त्रिवेणी संगमात कोट्यवधी लोकांनी स्नान केलंय.महाकुंभात पहिले अमृत स्नान मकर संक्रांतीच्या दिवशी संपन्न झालं.तर दुसरं अमृत स्नान मौनी अमावस्येदिवशी पार पडलं होतं.या अमृत स्नानाच्या वेळी गर्दी अनियंत्रित झाल्याने चेंगराचेंगरीत अनेकांना प्राण गमवावे लागले होते.या पार्श्वभूमीवर आज चोख सुरक्षा व्यवस्था राखण्यात येतेय.