धाराशिवच्या भूममधील दूध भेसळ प्रकरणाची व्याप्ती वाढलीय. पोलीसांच्या तपासात दूध भेसळीचा प्रकार सलग तीन वर्षांपासून सुरू असल्याची माहिती समोर आलीय. तब्बल चार कोटी 63 लाखाहून अधिक किमतीची पावडर विक्री करण्यात आलीय.तीन वर्षात दोन हजाराहून अधिक दूध संकलकांना ही पावडरची विक्री झाली. फक्त बेकरीसाठी विक्रीची परवानगी असलेल्या पावडर नियमबाह्य पद्धतीने दूध संकलन करणाऱ्यांना विक्री केल्याचा उघड झालंय.. मधुबन ट्रेडिंग कंपनी आणि हेमंत कॉर्पोरेशन या दोन कंपन्यांमधून पावडरची विक्री झालीय.