सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण असून जोरदार वाऱ्यासह अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. कणकवली, कुडाळ, मालवण सह सावंतवाडी तालुक्यात पावसाचा जोर दिसून येत आहे. हवामान विभागाकडून आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान गेल्या 24 तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी 34 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 67 मिमी एवढा पाऊस झाला आहे. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी...