देशातल्या साखर उद्योग यंदा आर्थिक संकटात सापडणार आहे..अशी चिन्हे निर्माण झाली आहेत.कारण देशाच्या साखरेच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात यंदा घट झाली आहे,जवळपास 60 लाख मेट्रीक टन घट झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. त्यामुळे महाराष्ट्र सह देशातल्या साखर 24 ते 25 हजार कोटींचा आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे,देशातल्या बदलत्या हवामानामुळे ऊस शेतीला बसलेल्या फटक्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे.