Pandharpur| शिंदे आज माढाच्या दौऱ्यावर,शिवाजी सावंतांच्या जाहिरातीतून तानाजी सावंतांचा फोटो वगळला

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज माढा तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. शिवसेनेचे संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी माढ्यामध्ये शिवसेना मेळाव्याचे आयोजन केले आहे. शिवाजी सावंत हे तानाजी सावंत यांचे बंधू आहेत. मात्र सावंत यांच्या आजच्या शिवसेना मेळाव्याच्या जाहिरातीतून तानाजी सावंत यांचा फोटो वगळण्यात आला आहे. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून तानाजी सावंत आणि शिवाजी सावंत या दोन्ही बंधूंमध्ये मतभेद असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर शिवाजी सावंत यांच्या जाहिरातीतून तानाजी सावंत यांचा फोटो वगळण्यात आल्याचे दिसून येते.

संबंधित व्हिडीओ