देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा देवांचं वर्गीकरण होणार आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते रेवंत रेड्डी यांनी पुन्हा एकदा हिंदू देवीदेवतांवरून वादग्रस्त विधान केलंय. त्यांनी भगवान शंकर आणि भगवान श्रीरामाचं थेट वर्गीकरणच करून टाकलं. त्यांनी त्यासाठी द्रविडी आणि आर्य थेअरी समोर ठेवली आहे. दक्षिण भारतात शंकराची पुजा अधिक होते तर उत्तरेत श्रीरामाला अधिक पुजलं जातं असं सांगताना त्यांनी भाजपनं श्रीरामाला राजकीय प्रतीक बनवल्याचा आरोप केला. इतकंच नाही तर त्यांनी शंकर हा गरीबांचा तर राम हा श्रीमंतांचा देव असल्याचं बोलून वाद ओढवून घेतलाय. यावरून भाजपनं रेवंत रेड्डींवर निशाणा साधलाय.