Pradeep Purnekar| ठाण्यात तणावाचं वातावरण; पोलिसांच्या भेटीनंतर ठाकरेंच्या नेत्यांची पत्रकार परिषद

ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यात तणावाचं वातावरण निर्माण झालंय.. प्रदीप पूर्णेकरांचा मृतदेह असलेली अॅम्ब्युलन्स पोलीस ठाण्यात आहे. हजारो लोकांचा जमाव पोलीस ठाण्याबाहेर उभा राहिलाय.. आणि आदित्य ठाकरे , संजय राऊतदेखील पोलीस ठाण्यात पोलिसांसोबत संवाद करतायत..अशा या स्फोटक वातावरणात ठाणे पोलिसांची चिंता वाढलीय.. मीनाक्षी शिंदे यांचं नाव एफआयआरमध्ये दाखल करावं अशी प्रमुख मागणी पूर्णेकर कुटुंबियांनी केलीय.. याच मागणीला दुजोरा देत संजय राऊतांनी ही मागणी पूर्ण करण्याचा इशारा दिलाय.. बाहेर हजारो लोक जमलेत.. ठाण्यात काहीही गडबड होऊ शकते असं सूचक वक्तव्य राऊतांनी केलंय..

संबंधित व्हिडीओ