ठाण्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीय.. त्यांच्यावर दोन राऊंड फायर करत गोळीबार करण्यात आला..या गोळीबारानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.. प्रदीप पूर्णेकर यांच्यावर मानपाडा इथल्या गणेश नगर येथील कार्यालयामध्ये हा प्राणघातक हल्ला झाला अशी माहिती आहे.. पाच जणांनी पूर्णेकरांवर हल्ला केला...यापैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.निखिल यादव, पप्या शिंदे, आकाश निमसे, संतोष कनोजियासह एकूण 5 जणांवर हत्येचा संशय आहे.. यामधील पप्या शिंदेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.. दरम्यान, या हत्येमागे आता माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती असल्याचा आरोप प्रदीप पूर्णेकरांचा मुलगा राम पूर्णेकरांनी केला... त्यामुळे राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाल्याची चर्चा आता रंगलीय. पूर्णेकर यांच्या हत्येवर ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी NDTV मराठीला प्रतिक्रिया दिली आहे.