कॅप्टन स्मित मच्छार यांच्या उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी टिळकनगर येथे स्थानिक नागरिकांनी सामूहिक हनुमान चालिसा पठणाचे आयोजन केले. त्यांच्या निवासस्थानी झालेल्या या भक्तिमय कार्यक्रमात बजरंगबलीची पूजा-अर्चना करण्यात आली. कॅप्टन स्मित मच्छर यांना उदंड आयुष्य लाभावे, यासाठी उपस्थितांनी प्रार्थना केली. या कार्यक्रमाला परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.