हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या आणि कर्जमाफी करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे केलीय.. पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकरी त्यांच्याकडे आशेने पाहत आहेत. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार नुकसानभरपाई आणि संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करावी. उगाच थातूरमातूर घोषणा करून जाऊ नये, असं उद्धव ठाकरेंनी पत्रात म्हटलं.