Chiplun मध्ये वशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; शिव नदीच्या पाणीपातळीतही वाढ,भाजी मंडई परिसरात पाणी

चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडलीय..त्यानंतर नगर परिषदेने सतर्कतेचा इशारा दिलाय. वशिष्ठी नदीची इशारा पातळी ही ५ मीटर आहे, सायंकाळी 7 वाजता पाणी पातळी 5.40 मीटरवर गेलीय.. मुसळधार पावसामुळे वाशिष्ठी आणि शिव नदीच्या पाणीपातळीत वाढ झालीय.वाशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडल्याने शहरातील बाजारपूल परिसरात, तसेच रंगोबा साबळे रोड, भाजी मंडई परिसरात नदीचं पाणी शिरलंय.त्यामुळे नागरिकांनी आवश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनाने केलं.

संबंधित व्हिडीओ