पुण्यात जानेवारी महिन्यात झालेला गुइलेन बॅरे सिंड्रोमचा उद्रेक कोंबड्यांमुळे झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.याबाबत संशोधन सुरू असून, लवकरच अंतिम निष्कर्ष हाती येईल अशी माहिती राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेचे संचालक डॉ. नवीन कुमार यांनी रविवारी दिली.पुण्यात जीबीएसचे २०२ रुग्ण आढळले होते. धरणाच्या परिसरात कुक्कुटपालन केंद्रे असल्याने तेथील कोंबड्यांच्या विष्ठेचे नमुने आम्ही तपासले. त्या केंद्रातील ५० टक्के नमुन्यांमध्ये हा जीवाणू आढळून आला. त्यामुळे जीबीएसचा उद्रेक कोंबड्यांमुळे झाल्याच्या प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय.