बातमी लातूर मधून आहे लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागाला पाणी टंचाईच्या झळा बसतायत. उदगीर तालुक्यामधील मारुती तांड्याला पाणी नसलेला तांडा म्हणून आता त्याची ओळख निर्माण झाली आहे. साडेतीनशे लोकसंख्या असलेल्या या तांड्यांना आता पाण्यासाठी वणवण करावी लागतेय.