कुर्ल्या मधलं बर्वे नगर आज महाराष्ट्राच्या नकाशावरती प्रसिद्ध झालं. काल रात्री बेस्ट च्या एका बस च्या धडकेनं याच बर्वे नगरमध्ये सात जण दगावले. नेमका हा अपघात का झाला? बर्वे नगरमध्ये ट्रॅफिक ची नेमकी समस्या काय आहे? त्यावरती उपाय काय आहेत? याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स हे जागतिक दर्जाचं कॉर्पोरेट हब बांद्रा आणि कुर्ला या दोन उपनगरांच्या मध्ये उभं राहिलंय.