रत्नागिरीवासीयांचं विमान प्रवासाचं स्वप्न लवकरच साकार होणारेय. विमानतळाचं मुख्य काम तब्बल 80 टक्के पूर्ण झालंय.उर्वरित कामं पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली वेळेत पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.भारतीय तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमध्ये नुकताच याबाबत सामंजस्य करार झालाय.रत्नागिरी विमानतळावरून 3 महिन्यात पहिलं टेकऑफ होईल अशी माहिती पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी.