यवतमाळ| वाशिमचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख यांचा अपघात झाला आहे. यवतमाळ दिग्रस तालुक्यातील साखरा गावाजवळ टिप्परने खासदाराच्या वाहनाला धडक दिली. एका कार्यक्रमातून परतत असताना दिग्रस रोडवरील साखरा गावाजवळ टिप्पर (ट्रकने) त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली.या अपघातात खासदारांच्या वाहनाचे नुकसान झाले असून यात मात्र सुदैवाने खासदार संजय देशमुख हे सुखरूप असून त्यांना किरकोळ दुखापत झाली असल्याची माहिती समोर येतेय. अपघातानंतर त्यांनी दिग्रस येथील म्हात्रे हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्याची माहिती मिळाली आहे.