उल्हास नदीतील जलपर्णी काढण्यास सुरुवात करण्यात आलीय. मात्र ही जलपर्णी काढताना नदीतील पाणी ढवळले जात असल्याने नदीतील पाण्याचा रंग पिवळसर झाला असून या पाण्याला काहीशी दुर्गंधी देखील सुटली आहे .पाणी पिवळसर रंगाचे येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.पाण्याचा रंग पिवळसर असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता सदर पाणी गाळून व उकडून वापरण्याचे खबरदारी घ्यावी असा आवाहन केडीएमसी प्रशासनाने केलीय.