3 months ago
मुंबई:

Maharashtra Live Update : विधानसभेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी निवडणूक होणार आहे. आजपासून निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. आजपासून अर्जभरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. 25 जून ते 2 जुलैपर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. 27 जुलै रोजी विधानपरिषदेतील भाजपचे चार, शिंदेसेना आणि उद्धवसेनेचे प्रत्येकी एक, काँग्रेसचे दोन, तर अजित पवार गट, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे प्रत्येक एक अशा एकूण 11 आमदारांची मुदत संपत असल्याने ही निवडणूक पार पडणार आहे.    

Jun 25, 2024 15:05 (IST)

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उच्च न्यायालयाचा दणका, अंतरिम जामीन पुन्हा नाकारला

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उच्च न्यायालयाचा दणका, अंतरिम जामीन पुन्हा नाकारला

Jun 25, 2024 15:00 (IST)

आताची सर्वात मोठी बातमी, पुणे पोर्शे अपघाताच्या अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. पुणे पोर्शे अपघाताच्या अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयात यावर सुनावणी झाली. 

Jun 25, 2024 14:36 (IST)

पुणे पोर्शे कार अपघात : अल्पवयीन मुलाच्या बालसुधारगृहातून सुटकेवर काही वेळात फैसला

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या बाल सुधारगृहातून सुटकेवर काही वेळात फैसला होणार आहे. काही वेळातच मुंबई उच्च न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे. बाल सुधारगृहातून सुटकेसाठी अल्पवयीन मुलाच्या आत्त्याने हिबस कॉर्पस याचिका दाखल केली आहे. 

Jun 25, 2024 14:34 (IST)

छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तपदी दिलीप गावडे यांची नियुक्ती

छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तपदी दिलीप गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिलीप गावडे 2007 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून डेअरी विकास आयुक्त पदावरून गावडे यांची छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

Advertisement
Jun 25, 2024 12:30 (IST)

पुणे ड्रग्स प्रकरणातील सर्वात मोठी अपडेट, तो तरूण अखेर ताब्यात

पुणे ड्रग्स प्रकरणातील सर्वात मोठी अपडेट, तो तरूण अखेर ताब्यात 

L3 लॉन्च पबमधील व्हिडिओमध्ये ड्रग्स घेताना दिसत असलेल्या तरुणाला पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेतलं आहे. 

सध्या त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. हा तरूण  बाथरुममध्ये ड्रग्ज घेत होता. त्या तरुणाला पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रान्चने ताब्यात घेतलं आहे. 

Jun 25, 2024 12:03 (IST)

उपाध्यक्षपद न मिळालेल्या इंडिया आघाडीकडून लोकसभा अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर

उपाध्यक्षपद न मिळालेल्या इंडिया आघाडीने लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार देण्यात आला आहे. के. सुरेश काँग्रेसकडून अध्यक्षपदाचे उमेदवार असतील.  

Advertisement
Jun 25, 2024 11:58 (IST)

पुणे महानगरपालिका ॲक्शन मोडवर, अनधिकृत पबच्या बांधकामावर बुलडोझर

मुख्यमंत्र्याच्या आदेशानंतर पुणे महानगरपालिका ॲक्शन मोडवर आलेली पाहायला मिळतेय. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार अनधिकृत पबच्या बांधकामावर बुलडोझर चालवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बार,  हॉटेल, पब यांच्या अनधिकृत बांधकामांना नोटीस पाठवण्यात येणार आहे. नोटीसांना उत्तर न आल्यास अशा आस्थापनांवर कारवाई करण्यात येणार आहे.  मुख्यमंत्रांच्या आदेशानंतर पालिकेकडून नोटीस पाठवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पुण्यात सात्यत्याने ड्रग्स आढळून येत असून नियमांचं उल्लंघन केल्याने कडक कारवाई करण्यात येणार आहे. 

Jun 25, 2024 11:40 (IST)

माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश

माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी शरद पवार गटात केला प्रवेश 

Advertisement
Jun 25, 2024 11:34 (IST)

लोकसभेचं उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला मिळायला हवं - राहुल गांधी

Jun 25, 2024 11:26 (IST)

नव्या संसद भवनात खासदारांच्या शपथविधीला सुरुवात, महाराष्ट्रातील खासदारांचा मराठीतून शपथविधी

नव्या संसद भवनात खासदारांच्या शपथविधीला सुरुवात, महाराष्ट्रातील खासदारांचा मराठीतून शपथविधी

Jun 25, 2024 11:14 (IST)

सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट, सकाळपासूनच मुसळधार पाऊस

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून दमदार पाऊस सुरू झाला आहे. कुडाळ तालुक्यात सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळत असून समुद्रही खवळलेला पाहायला मिळत आहे. हवामान विभागाकडून आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

Jun 25, 2024 11:13 (IST)

वाशिम जिल्ह्यात डेंग्यू रूग्णसंख्येत वाढ

वाशिम जिल्ह्यात 4 डेंग्यू आजारचे रुग्ण आढळून आल्याने जिल्हा आरोग्य विभाग सतर्क झाले आहेत. डेंग्यू आजारांच्या रुग्णांत वाढ झाल्याचंही आकडेवारीवरून दिसून येत आहे. वाशिम जिल्ह्यात डेंग्यू आजारांच्या रुग्णांत वाढ होतांना पाहायला मिळत असून वाशिम जिल्ह्यात 4 डेंग्यू आजारचे रुग्ण आढळून आल्याने जिल्हा आरोग्य विभाग सतर्क झाला असून दिवसेंदिवस होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे सर्दी थंडी तापेच्या रुग्णात वाढ होत असून रुग्णांनी आजार अंगावर न काढता तात्काळ रुग्णालयात जाऊन प्रथमोउपचार घेण्याचा सल्ला जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिला आहे.

Jun 25, 2024 10:49 (IST)

ओम बिर्ला पुन्हा लोकसभेचे अध्यक्ष होण्याची शक्यता

ओम बिर्लाच पुन्हा लोकसभेचे अध्यक्ष होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान मोदींसोबतही त्यांची बैठक सुरू असून थोड्याच वेळात उमेदवारी दाखल केली जाणार असल्याची माहिती आहे. 

Jun 25, 2024 10:41 (IST)

मनोज जरांगे पाटील यांना आज मिळणार डिस्चार्ज

मनोज जरांगे पाटील यांना आज छत्रपती संभाजीनगर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. येथून जरांगे पाटील थेट आंतरवाली गावात जाणार आहे. त्यांच्यासोबत किमान 150 ते 200 गाड्यांचा ताफा असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून जरांगे आणि भुजबळ यांच्याकडून होत असलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. जरांगे यांचा ताफा संभाजीनगर शहरातून बाहेरपडेपर्यंत 15 फिक्स पॉइंट लावण्यात आले आहे. तसेच जालना जिल्ह्याच्या हद्दीत देखील असाच पोलीस बंदोबस्त असणार आहे.

Jun 25, 2024 10:11 (IST)

शहरातील पबवर आता थेट जिल्हाधिकाऱ्यांचं लक्ष

शहरातील पबवर आता थेट जिल्हाधिकाऱ्यांचं लक्ष

पुणे हॉटेल ड्रग्स प्रकरणानंतर पबवर वचक ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी ॲक्शन मोडवर आहेत. जिल्हाधिकारी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. शहरातील पबवर वचक ठेवण्यासाठी आता पोलीस प्रशासन, महापालिका आणि उत्पादन शुल्क विभाग एकत्रितपणे कारवाई करणार आहे.  महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नवी नियमावली तयार करण्यात येणार आहे. पबवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

Jun 25, 2024 10:09 (IST)

लोकसभेच्या अधिवेशनानंतर शरद पवार यांचा महाराष्ट्र दौरा

लोकसभेच्या अधिवेशनानंतर शरद पवार यांचा महाराष्ट्र दौरा 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार महाराष्ट्र दौरा करणार आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 80-90 जागा लढवण्यासाठी चाचपणी सुरू आहे. या आठवड्यात महाविकास आघाडीची बैठक पार पडून जागांची चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Jun 25, 2024 10:09 (IST)

लोकसभेच्या अधिवेशनानंतर शरद पवार यांचा महाराष्ट्र दौरा

लोकसभेच्या अधिवेशनानंतर शरद पवार यांचा महाराष्ट्र दौरा 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार महाराष्ट्र दौरा करणार आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 80-90 जागा लढवण्यासाठी चाचपणी सुरू आहे. या आठवड्यात महाविकास आघाडीची बैठक पार पडून जागांची चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Jun 25, 2024 08:37 (IST)

गोंदिया जिल्ह्यात सारस गणना सुरू, 22 सारसांची नोंद

गोंदिया जिल्ह्यात 23 जूनपासून वनविभाग व जिल्ह्यातील विविध अशासकीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सारस प्रगणना सुरू करण्यात आली आहे. सारस पक्ष्यांचे अधिवास असलेल्या गोंदिया, तिरोडा व आमगाव तालुक्यांतर्गत एकूण 70 वेगवेगळ्या ठिकाणी जिल्ह्यातील अशासकीय स्वयंसेवी संस्थेचे स्वयंसेवक, सारस मित्र, शेतकरी व गोंदिया वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही गणना सकाळी 5 ते 9 या कालावधीत केली. सारस पक्षी प्रगणनेमध्ये एकूण 22 सारस पक्ष्यांची नोंद झालेली आहे. पण गेल्यावर्षीच्या तुलनेत पहिल्याच टप्प्यात कमी सारस आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 

Jun 25, 2024 07:57 (IST)

माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांचा आज शरद गटात प्रवेश

माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांचा आज शरद गटात प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी मंत्री सूर्यकांता पाटील या आज शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. सूर्यकांता पाटील या गेल्या दहा वर्षांपासून भाजपमध्ये होत्या. मात्र पक्षाने आपल्यावर काहीच जबाबदारी दिली नाही, असा आरोप करीत त्यांनी तीन दिवसांपूर्वी भाजप सदस्यत्वाचा रजीनामा दिला. 

Jun 25, 2024 07:54 (IST)

पहिल्या अंगारकी संकष्टीनिमित्त गणपती मंदिरामध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी

पहिल्या अंगारकी संकष्टीनिमित्त गणपती मंदिरामध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी

आज अंगारकी संकष्टीनिमित्त सांगलीत गणेश भक्तांनी मुख्य गणपती मंदिरामध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. यंदाच्या वर्षातील ही पहिली आणि शेवटची अंगारकी संकष्टी असल्याने भाविकांनी गणरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. यानिमित्त सांगलीतील गणपती मंदिराच्या परिसरामध्ये संस्थानकडून  आकर्षक सजावट करण्यात आली आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिराच्या परिसरामध्ये  सुरक्षा व्यवस्था आणि होमगार्ड याची नियुक्ती करण्यात आलेली आहे.  या संपूर्ण पार्श्वभूमीवर पहाटे पाच वाजल्यापासून सांगलीतील गणेश भक्त मुख्य गणपती मंदिरामध्ये आपल्या गणरायाच्या दर्शनासाठी येत आहेत.