मुंबईच्या घाटकोपरमध्ये महाकाय होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण होतंय. या दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग आली आणि प्रशासनानं मुंबईतील सर्व अनधिकृत होर्डिंग्स काढण्याचे आदेश दिले होते. ही दुर्घटना जेव्हा घडली तेव्हा मुंबईत पावसाला सुरुवात झाली होती. आता पुन्हा मुंबईत अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासन काय खबरदारी घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी...