वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं उत्तर महाराष्ट्राला अक्षरशः झोडपून काढलंय. एकट्या नाशिक जिल्ह्यातच सहा दिवसांच्या पावसानं जवळपास चार हजार हेक्टर वरील शेत पिकांना फटका बसलाय. कांदा, आंबा, गहू, डाळिंब आणि भाजीपाल्यासह अनेक पिकांचं मोठं नुकसान झालंय. एकंदरीतच हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं बळीराजा हतबल झालाय तो आर्थिक संकटात सापडलाय. पाहूया अवकाळीच्या पावसाचं थैमान या रिपोर्ट मधून.