Kashmir | शोपियन जिल्ह्यात लष्कराच्या कारवाईत 3 अतिरेक्यांचा खात्मा | NDTV मराठी

काश्मीरच्या शोपियन मधील जंगलात दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई सुरू आहे. तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आलंय. शाहिद पुट्टाई नावाच्या दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. तर आता दुसऱ्या दहशतवाद्याची ओळख पटली आहे. अदनान शफीदार असं दुसऱ्या दहशतवाद्याचं नाव आहे. शाहिदचं काश्मीरमधलं घर उध्वस्त केलं होतं. दहशतवाद्यांचा पहलगाम हल्ल्याशी काही संबंध आहे का? याबाबत अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाहीये. पण या हल्ल्यात खात्मा करण्यात आलेल्या शाहीदचं घर सुरक्षा बलांनी उध्वस्त केलं होतं. त्याच शाहीदचा या चकमकीत खात्मा केल्याची माहिती मिळते.

संबंधित व्हिडीओ