कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा वृंदावनला गेली आहेत. यावेळी त्यांनी कुंज आश्रमातील संत प्रेमानंद महाराज यांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले. यापूर्वीही विराट कोहली दोन हजार चोवीस रोजी संत प्रेमानंद महाराजांच्या दर्शनासाठी आला होता.