ताकद ही फक्त असून चालत नाही ती केव्हा वापरायची का वापरायची कशी वापरायची आणि कोण विरोधात वापरायची याचं ज्ञानही असावं लागतं आणि जर ते ज्ञान नसेल तर ताकद असूनही निरुपयोगी ठरते किंवा मग दुसराच कुणीतरी त्याचा फायदा उठवण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे पाकिस्तानच्या बाबतीत नेमकं हेच घडलेलं आहे. पाकिस्तान हा अण्वस्त्रधारी देश दहशतवाद्याच्या मुद्द्यावर भारत जेव्हा जेव्हा पाकिस्तानला धडा शिकवू बघतो तेव्हा तेव्हा पाकिस्तानची आण्विक शस्त्र अडचणीचा मुद्दा म्हणून समोर येतात. पण पहलगाम हल्ल्यानंतर भारताला प्रत्युत्तर देण्याच्या नादात पाकिस्ताननं जे काही केलं त्यामुळे पाकिस्तानची ही ताकद त्यांच्याच मुळावर उठण्याची वेळ आली आहे.