राज्यात काही ठिकाणी अवकाळीचा तडाखा बसतोय मात्र काही ठिकाणी पाणी पुरवठा खंडित करावा लागतोय. नवी मुंबईत अनेक ठिकाणी उद्या पाणी पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला वारंवार गळती होती आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत असल्यानं पालिकेनं आता दुरुस्तीचं काम हाती घेतलंय. या कामामुळे बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या विभागात, या काळात पाणी पुरवठा होणार नाही तसंच पनवेल महानगरपालिका हद्दीतील खारघर आणि कामोठे नोडचाही पाणी पुरवठा बंद असते.