मुंबईलगतच्या मिरा रोड परिसरात सुरू असलेल्या एका उंच इमारतीच्या बांधकामस्थळी मोठी दुर्घटना घडली आहे. जेपी इन्फ्रा संकुलातील बांधकामावर असलेली क्रेन अचानक कोसळल्याने एकच खळबळ उडाली. कोसळलेली क्रेन खाली उभ्या असलेल्या अनेक वाहनांवर पडल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून पाहणी आणि मदतकार्य सुरू आहे