Uddhav Thackeray आणि Eknath Shinde एकत्र येऊ शकतात, आमदार Ravi Rana यांचा दावा

अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी राज्याच्या राजकारणाबाबत मोठं भाकीत केलं आहे.राजकारणात काहीही अशक्य नसतं असं म्हणत येत्या काळात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पुन्हा एकत्र येऊ शकतात, असा दावा रवी राणा यांनी केला आहे.तसंच आगामी १५ दिवसांत सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांचे गट एकत्र येतील, असंही ते म्हणाले.भविष्यात सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील तर राज्याची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे असेल, असा दावाही राणांनी केला.त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं आहे.

संबंधित व्हिडीओ