राष्ट्रवादी अजित पवार गटात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. पक्षातील महत्त्वाच्या पदांवर नवीन नियुक्त्या जाहीर होणार आहेत. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष पदासाठी अनिल पाटील, धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटेंचं नाव चर्चेत आहे. तर महिला प्रदेशाध्यक्षपदाची रिक्त जागा देखील लवकरच भरण्यात येणार आहे. यासाठी वैषाली नागवडे यांचं नाव चर्चेत असल्याचं सुत्रांनी माहिती दिलीय.