अमेरिकेच्या Federal Reserve समितीत रघुराम राजन, महासत्तेला भारतीय अर्थतज्ज्ञांचं मार्गदर्शन

जगातील महासत्तेच्या अर्थव्यवस्थेला आता भारतीय दिशा देणार आहेत.अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची ‘बॅलन्स शीट पॉलिसी’ टास्क फोर्समध्ये महत्त्वाची नियुक्ती केली आहे.वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि मौद्रिक धोरणांची म्हणजे मॉनेटरी पॉलिसीची फेररचना करण्यासाठी फेडरल रिझर्व्हचे नवे चेअरमन केविन वॉर्श यांनी पाच विशेष समित्या स्थापन केल्या आहेत, त्यापैकी एका समितीत राजन यांची वर्णी लागली आहे. याव्यतिरिक्त हार्वर्ड विश्वविद्यालयाच्या अर्थशास्त्रज्ञ राज चेट्टी आणि मायक्रोसॉफ्टच्या कार्यकारी अधिकारी आशा शर्मा यांचा टास्क फोर्समध्ये समावेश केला आहे.

संबंधित व्हिडीओ