हिंदुत्ववादी संघटनेच्या एका महिला कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून त्याच संघटनेचे पदाधिकारी करण उल्लंघन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, संबंधित पदाधिकाऱ्याने महिलेला अश्लील स्वरूपाचे व्हिडिओ पाठविल्याचा आरोप आहे. तक्रार नोंदविण्यासाठी महिला आपल्या नातेवाईकांसह रामनगर पोलीस ठाण्यात गेली.. त्यावेळी पोलिसांकडून तक्रार तत्काळ स्वीकारली जात नसल्याचा आरोप करत तिच्या नातेवाईकांनी आक्षेप घेतला. यावेळी पोलीस आणि तक्रारदार पक्षामध्ये शाब्दिक वाद झाला.. जवळपास एक तास पोलीस ठाण्यात गोंधळाचे वातावरण होते.