श्रीकृष्णाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय मौलाना जर्जिस अन्सारी यांनी... श्रीकृष्ण पाच वेळचा नमाज पढत होते, अशी मुक्ताफळं अन्सारी यांनी उधळलीयत.. मौलाना जरजिस अन्सारी यांच्या या वादग्रस्त विधानानंतर एकच खळबळ उडाली आहे. जर हिंदूंनी आपले धर्मग्रंथ नीट वाचले, तर त्यांना इस्लामचे महत्त्व कळू लागेल असंही ते म्हणाले... मौलाना अन्सारी हे उत्तर प्रदेशातल्या इटावामधले मौलाना आहेत.. त्यांचं हे वक्तव्य जुनं आहे.. .मात्र श्रीकृष्ण जन्मभूमीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर ते पुन्हा व्हायरल होतंय.. .